Ind Vs NZ : हेमिल्टनमध्ये Arshdeep Singh चा भांगड्याने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरी वनडे रंगणार आहे. हा सामना हेमिल्टनमध्ये होणार असून टीम इंडिया हेमिल्टनमध्ये पोहोचली आहे.
India vs New Zealand 2nd Odi: उद्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind Vs NZ) यांच्यात दुसरी वनडे रंगणार आहे. हा सामना हेमिल्टनमध्ये होणार असून टीम इंडिया हेमिल्टनमध्ये पोहोचली आहे. यावेळी बीसीसीआयने (BCCI) हेमिल्टनला पोहोचल्यानंतरचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) भांगडा करताना दिसला.
पहिल्या वनडे सामन्यात भारतासाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंहने डेब्यू केला होता. उमरानने या सामन्यामध्ये 10 ओव्हरमध्ये 66 रन्स देत 2 विकेट्स काढले. अर्शदीपने 8.1 ओव्हरमध्ये एकंही विकेट न घेता 68 रन्स दिले.
दुसऱ्या सामन्यापूर्वी ही मोठी अडचण
टीम इंडियाने न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये पावसाचा अडथळा होता. अशातच उद्याच्या सामन्यात देखील पावसाचा खेळ होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हेमिल्टनमध्ये होणाऱ्या सामन्याच्या वेळी 100 टक्के पावसाची शक्यता आहे. दोन्ही टीम्समध्ये हा सामना न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवण्यात येणार आहे. तर भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता हा सामना होणार आहे.
टीम इंडियाचा खराब रेकॉर्ड
टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. टीम इंडियाने येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.तर न्यूझीलंडने उर्वरित ६ सामने जिंकले आहेत.
पहिला वनडे सामना
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 15 फेब्रुवारी 1981 रोजी सेडन पार्क येथे पहिला वनडे सामना खेळला गेला. येथे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुंडप्पा विश्वनाथच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अवघ्या 153 धावांत सर्वबाद झाला.