T-20 world Cup साठी उद्या टीम इंडियाची निवड, या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता
T20 world cup साठी उद्या भारतीय संघाची निवड केली जाणार आहे,
Team India Squad : आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक सुरू होण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि ओमान (Oman)मध्ये खेळला जाणार आहे, तर भारत 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान सारख्या काही दिग्गज संघांनी टी-20 विश्वचषकासाठी संघांची घोषणा केली आहे आणि असे मानले जाते की लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती (BCCI) 15 सदस्यीय संघाची घोषणा करेल.
15 सदस्यीय संघाव्यतिरिक्त, निवड समिती कोविड प्रोटोकॉलच्या दृष्टीने तीन राखीव खेळाडूंची निवड करेल.
युझवेंद्र चहलची निवड निश्चित वाटते, तर कुलदीप यादवची बाहेर पडणेही जवळपास निश्चित आहे. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळेल असे मानले जाते.
संभाव्य भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (vc), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (wk), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर
अतिरिक्त सलामीवीर: शिखर धवन/पृथ्वी शॉ
राखीव कीपर: इशान किशन/संजू सॅमसन
अतिरिक्त फिरकीपटू: वरुण चक्रवर्ती/राहुल चाहर
डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज: चेतन साकरिया/टी नटराजन
फिटनेस विषयी: वॉशिंग्टन सुंदर.
जडेजासाठी कव्हर: अक्षर पटेल/कृणाल पंड्या.