Nitin Menon : निर्णयासाठी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू दबाव...; अंपायर नितीन मेनन यांचा खळबळजनक दावा!
Nitin Menon : नितिन मेनन यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पीटीआयशी बोलताना नितीन मेनन ( Nitin Menon ) यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंवर गंभीर आरोप लावले आहेत.
Nitin Menon : भारताचे प्रसिद्ध अंपायर नितिन मेनन सर्वांना माहिती आहेत. यापूर्वी नितीन मेनन आणि टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याच्यासोबतच्या मैदानावरील वादाने चर्चेत राहिले होते. अशातच पुन्हा एकदा मेनन चर्चेत आले आहेत. नितिन मेनन यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्य म्हणजे यावेळी त्यांनी थेट टीम इंडियावर निशाणा साधला आहे.
नितिन मेनन ( Nitin Menon ) हे क्रिकेट जगतातील नावाजलेले अंपायर आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबत त्यांनी आयपीलएलच्या ( IPL 2023 ) सामन्यांमध्ये मेनन ( Nitin Menon ) यांनी अंपायरिंग केलं होतं. अशातच त्यांनी पीटीआयशी बोलताना टीम इंडियाबाबत ( Team India ) मोठा खुलासा केला आहे.
पीटीआयशी बोलताना नितीन मेनन ( Nitin Menon ) यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंवर गंभीर आरोप लावले आहेत. मेनन म्हणाले, जेव्हा टीम इंडिया ( Team India ) भारतात खेळते तेव्हा खूप हाईप होतो. टीम इंडियाचे अनेक मोठे स्टार्स सामन्यामध्ये अंपायरवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.
मेनन ( Nitin Menon ) पुढे म्हणाले की, ज्यावेळी निर्णय फिफ्टी फिफ्टी असतो, त्यावेळी काही खेळाडू हा निर्णय त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दबाब असून देखील आम्ही नियंत्रण गमावत नाही. शिवाय यावेळी त्यांच्या मागणीकडे आम्ही लक्ष देत नाही.
कशी असते अंपायर्सची पर्सनल लाईफ
खेळाडूंप्रमाणे अंपायर्सना देखील शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागते. मी 24 तासांमध्ये माझी तब्बल 75 मिनिटे जिममध्ये घालवतो. याचं कारण म्हणजे आम्हाला देखील 7 तास मैदानावर उभं राहावं लागतं, असंही मेनन यांनी सांगितलंय.
एशेस सिरीजमध्ये मेनन करतायत अंपायरिंग
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये एशेज सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजच्या तिन्ही टेस्टमध्ये नितीन मेनन ( Nitin Menon ) अंपायरिंग करतायत. मेनन 2020 पासून टेस्ट सामने, वनडे आणि टी-20 साली अपायरिंग करतात. अनेकदा ते त्यांच्या वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आले आहेत.