मुंबई : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना इंग्लंडशी खेळणार आहे. जूलैच्या १ तारखेला हा सामना होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. तर या सामन्यातील शेवटचा सामना जिंकून भारत मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात आहे. तर इग्लंडही हा सामना बरोबरीत सोडवण्याची तयारी करतेय. मात्र या सामन्याच्या निकालातच कळणार आहे, कोणता संघ बाजी मारतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इग्लंडविरूद्ध शेवटच्या सामन्य़ाआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडिया एका मजबूत संघासह मैदानात उतरणार आहे. त्यात आता भारताची ताकद आणखीण वाढणार आहे. कारण भारतीय संघात स्पिनर आर.अश्विनची एन्ट्री होणार आहे. कोविडमुळे तो या मालिकेला मुकण्याची शक्यता होती.मात्र तो आता रिकव्हर झाला आहे.  


अश्विन भारतीय कसोटी संघासोबत इंग्लंडमध्ये येऊ शकला नाही. कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना फ्लाइट सोडावी लागली होती. कोविड-19 आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर त्याला लीसेस्टरमधील संघात सामील होण्यास सांगण्यात आले. तो आज सकाळी टीम इंडियामध्ये दाखल झाला. बोर्डाच्या अधिकृत हँडलने ट्विटरवर शेअर केलेल्या छायाचित्रांनी याची पुष्टी केली. छायाचित्रात अश्विन लीसेस्टरशायर काउंटी क्लब ग्राउंडवर इतर खेळाडूंसोबत संघात दिसत होता.


कोरोना पॉझिटिव्ह
आश्विन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे 16 जून रोजी मुंबईतील इतर सदस्यांसह उड्डाण करू शकला नव्हता. जयंत यादवला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते. परंतु अश्विन आता कोविडमधून बरा झाला असून संघात सामील झाला आहे. त्यामुळे इग्लंडविरूद्ध  सामन्यात टीम इंडियाला मदत होणार आहे.