Team India squad announced : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान या फलंदाजांना संधी देण्यात आलीये. तसेच ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना देखील संघात सामील करण्यात आलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाचा फिरकीचा जादूगर आर आश्विन याची टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. तर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या स्पिनर्सला संघात स्थान मिळालंय. एवढंच नाही तर मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल या फास्टर गोलंदाजांना स्कॉडमध्ये सामील करण्यात आलंय. पण मोहम्मद शमीचं कमबॅक पुन्हा रखडल्याचं पहायला मिळतंय.


टीम इंडियाचं वेळापत्रक


बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.


बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया - रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.