T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची निवृत्तीचा निर्णय
भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket Team) मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.
मुंबई : आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2022) सोमवारी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. अवघ्या काही दिवसांवर वर्ल्ड कप येऊन ठेपलाय. त्याआधी भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket Team) मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. रॉबिन उथप्पाने क्रिकेटला रामराम केला आहे. त्याने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. (team india star batter robin uthappa announced retirment in all format before t20 world cup 2022)
ट्विटमध्ये काय म्हटलं?
रॉबिन उथप्पाने एक नोट शेअर करत लिहिलं की, "माझ्या देशाचे आणि माझ्या राज्य कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सर्वात सन्मानाची गोष्ट आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत होतो आणि माझ्या अंतःकरणातील कृतज्ञतेने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे", असं उथप्पाने ट्विटमध्ये म्हटलंय.
भारतीय संघात 2006 मध्ये पदार्पण
रॉबिनने 2006 मध्ये टीम इंडियात डेब्यू केलं. उथप्पाने मीडल ऑर्डरपासून ते ओपनिगंपर्यंत प्रत्येक ठिकाणी बॅटिंग केली. उथप्पाने 2007 टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा टी-20 चॅम्पियन बनली. त्या टीममध्ये उथप्पाचाही समावेश होता.
कारकिर्दीतील सर्वात मोठा सामना
उथप्पाने टीम इंडियासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या, तर टी20 मध्ये त्याने 24.9 च्या सरासरीने 249 धावा केल्या. उथप्पाने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सामना हा 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. या ग्रुप स्टेज मॅचमध्ये उथप्पाने 39 बॉल्समध्ये 50 रन्स केले. तर मॅच टाय झाल्यानंतर मॅच बॉल आऊटने संपली. यातही उथप्पाने महत्त्वाची भूमिका बजावली.