मुंबई : टी 20 वर्ल्डकप 2021 यूएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी -20  वर्ल्डकपमध्ये भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. परंतु टी 20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादवचे सिलेक्शन झाल्यापासून त्याने त्याचा फ्लॉपशो दाखवायला सुरूवात केली आहे. तो सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये आपली चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. त्याचा सध्या फ्लॉप शो सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवसाठी श्रेयस अय्यरसारख्या प्रतिभावान खेळाडूला टी -20 वर्ल्डकप संघात निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले. श्रेयस अय्यरला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध खेळलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला.


आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवची खराब कामगिरी सुरूच आहे. ही खराब कामगिरी पाहून चाहतेही खूप निराश झाले आहेत. भारतीय चाहत्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न सतत निर्माण होत असतात.


आयपीएलमध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे सूर्यकुमार यादवांला आता जोरदार ट्रोल केले जात आहे. आयसीसीने जारी केलेल्या नियमांनुसार, संघ व्यवस्थापन अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या संघात बदल करू शकते. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला टी -20 वर्ल्डकप संघातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.



खूप खराब कामगिरी


आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या मॅचला विश्वचषक 2021 च्या तयारीसाठी चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. आतापर्यंत भारताकडून टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या काही खेळाडूंची कामगिरी दुसऱ्या टप्प्यात खूपच खराब झाली आहे. खासकरून जर तुम्ही सूर्यकुमार यादवच्या खेळावर नजर टाकली, तर त्याने मुंबई इंडियन्ससाठी (MI) यूएई लेग मध्ये 4 सामने खेळले आहेत. पण, त्याची बॅट फारशी काही चालली नाही.


दुसरीकडे, श्रेयस अय्यर ज्या प्रकारात यूएईच्या खेळपट्ट्यांवर धावांचा पाऊस पाडत आहे त्या दृष्टीने, टी 20 वर्ल्डकप 2021 साठी घोषित 15 सदस्यीय संघात त्याला खेळायची संधी मिळाल्याच तो भारतासाठी चांगली कामगीरी करु शकतो. त्यामुळे सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म पाहता हा बदल भारतीय संघात केला जाऊ शकतो. मात्र, त्याने श्रीलंकेविरुद्ध खूप चांगली कामगिरी केली आहे. याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना दोन शानदार डाव खेळले आहे.



टी -20 वर्ल्डकप कधी सुरू होईल?


टी 20 वर्ल्डकप 2021 यूएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. स्पर्धेची सुरुवात ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील फेरी 1 च्या ग्रुप बीच्या सामन्याने होईल, ज्यामध्ये ब गटातील इतर संघ स्कॉटलंड आणि बांगलादेशमध्ये एकमेकांविरोधात लढतील.


गट अ मध्ये आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबिया यांचा समावेश आहे. फेरी 1 चे सामने 17 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान चालतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 23 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सुपर 12 टप्प्यात जातील.


पहिला उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे होणार आहे. दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला दुबईत खेळली जाईल. दोन्ही उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळला जाईल. फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.