भारतात क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांना जाणून घ्यायला आवडतं. भारतात हिंदू मुस्लिम विवाहाबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. अनेकजण अशा विवाहांना विरोध करताना दिसतात. परंतू भारतीय क्रिकेट टीममध्ये असे 4 मुस्लिम क्रिकेटर्स आहेत ज्यांनी प्रेमाखातर धर्माच्या भिंती तोडून हिंदू मुलींशी लग्न केलं. 


जहीर खान सागरिका घाटगे : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी गोलंदाज जहीर खान याने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्या सोबत लग्न केलं. 2017 रोजी जहीर आणि सागरिका यांचा विवाह झाला. सागरिकाच्या पूर्वी जहीर खान बॉलिवूड अभिनेत्री  ईशा शरवानी हिच्या सोबत रिलेशनशिपमध्ये होते. आठ वर्ष दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले 2011 च्या वर्ल्ड कप दरम्यान दोघांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या मात्र नंतर जहीर आणि ईशाचं लग्न झालं. ईशा शरवानीच्या नंतर सागरिका जहीर खानच्या आयुष्यात आली. दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असून दोघे इतरांसाठी कपल गोल ठरत आहेत. 



मोहम्मद कैफ आणि पूजा यादव : 


मोहम्मद कैफ हा सुद्धा भारताचा माजी क्रिकेटर असून इंग्लंडमध्ये भारताला 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकवून देण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. त्याच नेटवेस्ट ट्रॉफीने भारतीय क्रिकेटचं रुपडं पालटलं. मोहम्मद कैफच क्रिकेट करिअर हे फार मोठं नव्हतं मात्र यात त्याने जशी कामगिरी केली त्यामुळे तो नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिला. मोहम्मद कैफने 2011 मध्ये त्याची गर्लफ्रेंड पूजा यादव हिच्याशी लग्न केलं. 



मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर : 


भारतीय क्रिकेट टीमच्या इतिहासात माजी कर्णधार मंसूर अली खान पटौदी आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांची जोडी खूप खास राहिली. माजी क्रिकेटर मंसूर अली खान पटौदी यांनी धर्माने हिंदू बंगाली असलेल्या शर्मिला टागोर यांच्याशी विवाह केला. मंसूर अली खान पटौदी यांनी शर्मिला टागोर यांच्याशी 1968 मध्ये विवाह केला. दोघांना सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान अशी तीन मुलं आहेत.  मंसूर अली खान पटौदी यांचं 2011 रोजी निधन झाले. 



मोहम्मद अजहरुद्दीन आणि संगीता बिजलानी : 


भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचं पहिलं लग्न हे नौरिन नावाच्या मुलीशी झालं होतं. मात्र नौरिनशी त्यांचा 1996 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर मोहम्मद अजहरुद्दीनने संगीता बिजलानीशी दुसरं लग्न केलं. मात्र संगीता बिजलानी सोबत सुद्धा मोहम्मद अजहरुद्दीनचं दुसरं लग्न फार काळ टिकू शकलं नाही.  2010 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 



अजित आगरकर आणि फातिमा घडियाली : 



मराठमोळे माजी क्रिकेटर अजित आगरकर यांची लव्ह स्टोरी सुद्धा हटके आहे. अजित आगरकर यांना त्यांच्या मित्राच्या बहिणीसोबत प्रेम झाले. फातिमा घडियाली या धर्माने मुस्लिम होत्या परंतु धर्माच्या भिंती तोडून अजित यांनी 2002 रोजी फातिमा घडियाली यांच्याशी लग्न केलं. अजित यांची पत्नी दुसर्‍या धर्माची असल्याने त्यावेळी त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.