Team India for ODI World Cup -2023 : भारतीय टीम सध्या श्रीलंकेत असून एशिया कपच्या स्पर्धेसाठी खेळतायत. यंदाचा एशिया कप ( Asia cup 2023 ) हायब्रिड मॉडलवर खेळवण्यात येतोय. तर ऑक्टोबरमध्ये सुरु होणार वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) भारतात आयोजित केला जाणार आहे. यावेळी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ( Team India ) घोषणा कधी होणार असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 


पुढच्या आठवड्यात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचा वनडे वर्ल्डकपसाठी ( ICC Cricket World Cup 2023 ) टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय टीमची ( Team India ) घोषणा नेपाळ विरुद्ध भारताच्या ग्रुप स्टेज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 5 सप्टेंबर रोजी करण्यात येण्याची शक्यता आहे. 


5 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना त्यांच्या संघाची यादी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) सादर करावी लागणार आहे. भारतीय वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर गुरुवारी श्रीलंकेत पोहोचणार आहेत. कदाचित यावेळी बैठक घेऊन टीम इंडियाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.


15 खेळाडूचं चमकणार नशीब


आशिया कप 2023 साठी 17 सदस्यीय टीम निवडण्यात आली होती. मात्र वर्ल्डकपसाठी टीम इंडिया 15 खेळाडूंपुरता मर्यादित ठेवावी लागणार आहे. वर्ल्डकपसाठी ( ICC Cricket World Cup 2023 ) 15 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आशिया कप टीममधून तिलक वर्मासह बॉलरच्या पर्यायांपैकी एकाला वगळण्यात येण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीसाठी शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या निवड होण्याची शक्यता कमी आहे.


कशी असेल संभाव्य टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल , संजू सॅमसन