Team India: रोहित-विराटच्या भांडणामध्ये टीम इंडियाचे झाले 2 गट; माजी कोचच्या खुलाश्याने एकच खळबळ
टीम इंडियामध्ये रोहित आणि विराट असे दोन गट पडल्याचा आरोपंही करण्यात आला. यामध्येच आता टीम इंडियाचे माजी कोच यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याबाबत खुलासा केला आहे.
Rohit Sharma Virat Kohli Rift, Coach R Sreedhar Book: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यामधील संबंध काही फारसे चांगले नसल्याचं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. इतकंच नव्हे तर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi shashtri) यांनी या दोघांमधील संबंध सुधरवण्यासाठी खूप प्रयत्न केले असल्याचंही आपल्या कानावर आलं असेल. 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. त्यावेळी टीम इंडियामध्ये रोहित आणि विराट असे दोन गट पडल्याचा आरोपंही करण्यात आला. यामध्येच आता टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R Sridhar) यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याबाबत खुलासा केला आहे.
कोचच्या खुलास्याने क्रिकेट जगतात खळबळ
क्रिकेटमध्ये असे काही किस्से असतात, जे चाहत्यांच्या कधी समोर येत नाहीत. मात्र लोकं खेळाडूंबाबत जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतात. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माने बरंच काही केलं आहे, ज्याला विसरणं शक्य नाही. एक वेळ अशी आली होती, जेव्हा हे दोन्ही मित्र एकमेकांचे शत्रू झाले होते.
याचबाबत खुलासा करत माजी फिल्डिंग कोच आर. श्रीधर(R Sridhar) यांनी त्यांच्या 'कोचिंग बियॉन्ड’या पुस्तकात लिहिलंय की, "2019 वर्ल्डकपनंतर ड्रेसिंग रूममध्ये कथित प्रमाणात काय झालं आणि सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध हरल्यानंतर फार वाईट बातम्या समोर आल्या. टीम इंडियामध्ये विराट आणि रोहित असे दोन गट झाल्याचंही बोललं गेलं. इतकंच नाही तर सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचंही म्हटलं गेलं. मात्र रवी शास्त्री आंनी असं होऊ दिलं नाही."
दोघांचं नातं सुधारण्यात रवी शास्त्रींची मोलाची भूमिका
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील चांगले संबंध कधीही लपून राहिले नाहीत. कोहली शास्त्री यांना आपलं गुरु मानतो. ज्यावेळी रोहित आणि विराट यांच्यात आलबेल नव्हतं, तेव्हा शास्त्री यांनी पुढाकार घेऊन मध्यस्ती केलं असल्याचं म्हटलं गेलं.
याबाबत खुलासा करताना श्रीधर(R Sridhar) त्यांच्या पुस्तकात लिहितात, लॉडरहिलमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सिरीजसाठी वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर सुमारे 10 दिवसांनी आम्ही अमेरिकेत उतरलो होतो. त्यावेळी रवी शास्त्री यांनी विराट आणि रोहितला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि त्यांच्याशी बातचीत केली. भारतीय क्रिकेट चांगलं राहण्यासाठी त्यांना एकत्र असण्याची गरज आहे, असं सांगितलं. शास्त्रींनी त्यांना म्हटलं की, माझी इच्छा आहे की, तुम्ही हे पाठी सोडून द्यावं आणि टीमला पुढे नेण्यासाठी एकत्र यावं."