मुंबई : विकेट किपर म्हणून धोनीची चपळाई कोणीही नाकारू शकत नाही पण भारतीय महिला टीमची विकेट किपर सुषमा वर्मा धोनीपेक्षाही चपळ आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये सुषमाची चपळाई पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्ल्ड कपमध्ये भारतानं वेस्ट इंडिजला सात विकेटनं हरवलं. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेत भारतानं वेस्ट इंडिजला १८३ रन्सवर रोखलं. १८४ रन्सचा पाठलाग करताना स्मृती मंधानानं नाबाद १०६ रन्स बनवल्या.


या मॅचमध्ये स्मृतीच्या खेळीचं कौतुक होत असतानाच सुषमानं तिच्या विकेट किपिंगनं सगळ्यांचीच मनं जिंकली. सुषमाही हिमाचल प्रदेशची आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या नव्या स्टेडियमच्या पॅव्हेलियनला सुषमाचं नाव दिलं आहे. २०१४मध्ये इंग्लंड दौऱ्यात सुषमानं तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली होती. 


पाहा सुषमाचा चपळाई