Team India : टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागलाय. यानंतर आता टीमने आपल्याच देशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर (One day world cup) फोकस ठेवलाय. 2023 मध्ये हा वर्ल्डकप आयोजित करण्यात आलाय. टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून टीमला 3 टी-20 आणि 3 वनडे सामने खेळायचे आहेत. दरम्यान ही सिरीज संपल्यानंतर खेळाडूंना बांगलादेशचा दौरा करायचा आहे. याठिकाणी 3 वनडे सामन्यांची सिरीज आणि 2 टेस्ट सामन्यांची सिरीज आहे. याचाच अर्थ वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल खूप व्यस्त राहणार आहे.


वनडे वर्ल्डकप 2023 च्या पूर्वी टीमचं बिझी शेड्यूल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडचा दौरा करतेय. या सिरीजचा शेवटचा सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर बांगलादेशाच्या दौऱ्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमला खेळायचं आहे. या सिरीजचा पहिला सामना 4 डिसेंबर रोजी होणार असून 22 डिसेंबरला अखेरचा सामना होणार आहे. या दोन्ही सिरीजने या वर्षाचा शेवट होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी भारताला नव्या आव्हानांसह मैदानात उतरावं लागणार आहे.


2023 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल


50 ओव्हरचा वर्ल्डकप पुढील वर्षी भारतात खेळवला जाणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या पराभवानंतर रोहित शर्माला एकदिवसीय वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा आहे. अशातच भारतीय टीम एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जातोय.


मात्र वर्ल्डकपपूर्वी म्हणजेच जानेवारीमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत वनडे सिरीज खेळायची आहे. या सिरीज वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी महत्त्वाचा मानला जातोय.