कानपूर : टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीची उत्कृष्ट कामगिरी


- बुमराहच्या 47 ओव्हरमधल्या 5 व्या बॉलवर गँडहोम चुकला आणि बॉल धोनीच्या हातात आला.


- नॉन-स्ट्रायकरवर असणाऱ्या टॉम लॅथम रन काढण्यासाठी क्रिज सोडून निघाला.


- धोनीने लाथमला अर्ध्या क्रिजवर पाहिलं. आणि बॉल स्वत: थ्रो न करता नॉन स्ट्राईकरच्या दिशेकडे बुमराहच्या हातात दिला.


- बुमराहने धोनीने बॉल त्याच्या हातात दिल्यानंतर लगेचच लॅथमला रन आऊट करत मॅच आपल्या बाजुने झुकवली.


- एवढ्या कमी वेळात धोनीच्या लगेचच ही गोष्ट लक्षात आली. त्याने काही सेकंदामध्ये परिस्थिती पाहून बॉल कोणताही घाई न करता बुमराहच्या हातात दिला. यानंतरच सामन्यावर भारतीय टीमची पकड मजबूत झाली आणि भारताचा विजय झाला.