IND vs IRE 2nd T20I : बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव
Ireland vs India, 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे.
Team India beat Ireland in 2nd T20I : भारतीय संघ आणि आयर्लंड (Ireland vs India) यांच्यात 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिन येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. आयर्लंडचा संघ 152 धावांवर गारद झाला. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे. आता तिसरा सामना जिंकून टीम इंडिया क्लिन स्वीप देण्याच्या तयारीत आहे.
भारताने दिलेल्या 186 धावांचं आव्हान पार करताना आयर्लंडच्या संघाची सुरूवात चांगली झाली नाही. कॅप्टन पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) लगेच बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने पॉल स्टर्लिंग आणि मागील सामन्याच चांगली खेळी करणाऱ्या लॉर्कन टकरला बाद करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर अँड्र्यू बालबर्नीने 72 धावांची आक्रमक केली. त्याला कर्टिस कॅम्फरने साथ दिली. मात्र, रवी बिश्नोईने 2 विकेट काढल्या तर अर्शदीपने अँड्र्यू बालबर्नीची विकेट काढत टी-ट्वेंटी क्रिकेटमधील 50 विकेट पूर्ण केल्या. तर कॅप्टन जसप्रीत बुमराहने देखील 2 विकेट घेत भारताच्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. त्यामुळे आयर्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी 186 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने आक्रमक खेळी करत 26 चेंडूत 40 धावा केल्या. तर अखेरीस रिंकू सिंगने हल्लाबोल केला. रिंकू सिंगने 38 आणि शिवम दुबेने नाबाद 22 धावा केल्या. दोघांनी धावफलकाला सिक्स खेचत फिनिशिंग टच दिला.
पाहा दोन्ही संघ
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (C), लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (WK), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (C), रवी बिश्नोई.