IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; इंग्लंडच्या टीमचा 347 रन्सने केला पराभव
India records biggest win in women`s test history: महिलांच्या टीम इंडियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 347 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. टीम इंडियाच्या मुलींनी इंग्लंडला विजयासाठी 479 रन्सचं लक्ष्य दिलं होतं.
India records biggest win in women's test history: टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सामना खेळवला गेला. डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला असून टीम इंडियाने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
महिलांच्या टीम इंडियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 347 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. टीम इंडियाच्या मुलींनी इंग्लंडला विजयासाठी 479 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी प्रत्युत्तरात इंग्लंडचे सर्व फलंदाज 131 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात पहिल्या डावातही इंग्लंडची टीम अवघ्या 136 रन्सवर आटोपली होती. भारतीय महिलांनी प्रथमच मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला आहे.
दिप्ती शर्माला मिळाला मॅन ऑफ द मॅच
इंग्लंड विरूद्ध झालेल्या या एकमेव टेस्ट सामन्यात टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने दोन्ही डावात चमकदार कामगिरी करत 87 रन्स केले. याशिवाय तिने 9 विकेट्सही घेतल्या. या सामन्यातील विजयी कामगिरीसाठी तिला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं.
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना दीप्ती शर्माने 67 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. या खेळीत तिने 10 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. तसंच दिप्तीने गोलंदाजीमध्येही कमाल केली. गोलंदाजी करताना तिने पहिल्या डावात 5 विकेट्स तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडच्या फलंदाज ढेपाळल्या
टीम इंडियाने पहिल्या डावात 428 रन्स केले होते. याविरूद्ध इंग्लंडने दोन्ही डावात मिळूनही इतके रन्स केले नाही. इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांवर आटोपला. त्याचवेळी दुसऱ्या डावात इंग्लंडची टीम केवळ 131 धावांत गडगडली. या सामन्यात इंग्लंडच्या नॅट सीव्हर ब्रंटने टीमसाठी सर्वाधिक म्हणजेच 59 रन्स केले.