Womens Team India : काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने (BCCI) महिला T20 वर्ल्डकप 2023 (T20 WC 2023) साठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. यावेळी संपूर्ण टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) सोपवण्यात आली आहे. तर उपकर्धणारपदाची जबाबदारी फलंदाज स्मृति मंधानाला (Smriti Mandhana) देण्यात आली आहे. यावेळी बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत एक धडाकेबाज खेळाडू 14 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक करणार आहे. 


10 फेब्रुवारी रोजी सुरु होणार T20 WC 2023


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICC महिला T20 वर्ल्डकप 2023 (T20 WC 2023) ची सुरुवात 10 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. टीम इंडिया 12 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरूद्ध सामना खेळून स्पर्धेला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये असून इंग्लंड, वेस्टइंडिज, पाकिस्तान आणि आयरलँडसोबत सामना खेळावा लागणार आहे. या ग्रुपमध्ये ज्या 2 टीम्स चांगला खेळ करतील त्यांना सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.


टी-20 वर्ल्डकप फायनल 26 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्येच आयोजित करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन झालं त्यामध्ये 14 महिन्यांनंतर एका घाकड प्लेयरची एन्ट्री होणार आहे. 14 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये शिखा पांडेचं कमबॅक होणार आहे. अशामध्ये स्नेह राणा आणि मेघना सिंह यांना टीममदून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दरम्यान सिलेक्शन टीमचा हा निर्णय काही चाहत्यांना आवडलेला नाहीये.


ICC महिला T20 WC 2023 साठी कशी असेल टीम इंडिया


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (wk), ऋचा घोष (wk), जेमिमाह रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजलि सरवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडे


रिझर्व खेळाडू: सबभिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंह


ट्राय सीरीजसाठी टीम इंडियाची झाली निवड


यंदाच्या वर्षी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि ट्राय सिरीज खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडियाचं सिलेक्शन झालं आहे. सध्याच्या घडीला पूजा वस्त्राकर तिच्या फीटनेसमुळे खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियातील खेळाडूंना तिथल्या पीचची माहिती व्हावी यासाठी ट्राय सिरीज खेळवण्यात येणार आहे. 


ही सिरीज 19 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अशी असणार आहे. या सिरीजमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज या टीम्स सहभागी असणार आहेत. सिरीजमधील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत असा रंगणार आहे.


ट्राय सिरीजसाठी कसा असेल टीम इंडियाचा स्क्वॉड


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड़, राधा यादव, रेणुका ठाकुर, मेघना सिंह, अंजलि सरवानी, सुषमा वर्मा (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्रकार, सबभिनेनी मेघना, स्नेह राणा, शिखा पांडे