मुंबई : टीम इंडिया सध्या बांगलादेश (India Tour Of Bangaladesh) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाने (Indian Cricket Team) वनडे सीरिज गमावली आहे. आता त्यानंतर 14 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर दुखापतीतून सावरला आहे. तसंच मैदानात परतला आहे. हा ऑलराउंडर दुखापतीमुळे क्रिकेटपासून 2 महिने लांब होता. दुखापतीमुळे या खेळाडूला मोठ्या स्पर्धेला मुकावं लागलं होतं. (team india young all rounder venkatesh iyer started net practise share video india tour of bangladesh)
 
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) दुखापतीतून सावरला आहे. अय्यरला ऑक्टोबरमध्ये सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत (Syed Mushtaq Ali T20 Trophy) मध्य प्रदेश विरुद्ध दुखापत झाली होती. वेंकटेशच्या पायाच्या घोट्याला ही दुखापत झाली होती. मात्र आता वेंकटेश दुखापतीतून सावरला आहे. वेंकटेशने स्वत: सराव करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी जवळपास 2 महिने असह्य त्रास आणि वेदना सहन केल्यात. अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर आणि फिजियोथेरेपिस्टच्या मार्गदर्शनानंतर मी मला आवडणारी गोष्ट करतोय. मी यासाठी फार आभारी राहेन. मला अजूनही पूर्णपणे फीट होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. मी त्या दिशेने सुरुवात केली आहे", असं वेंकटेश व्हीडिओ शेअर करत म्हणाला आहे.


वेंकटेशला आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) टीम इंडियासाठी एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. अय्यर ओपनिंगपासून ते शेवटपर्यंत कोणत्याही स्थानी बॅटिंग करु शकतो. अय्यरला गेल्या काही महिन्यांपासून सातत्यान फॉर्मसह झगडावं लागतंय. 


दरम्यान वेंकटेशने आतापर्यंत 9 टी 20 सामन्यांमध्ये 133 धावा केल्या आहेत. तसेच 5 विकेट्सही घेतल्या आहेत. तर 2 एकदिवसीय सामन्यांमध्येही अय्यरने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. वेंकटेश आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो.