David Johnson Death : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू डेव्हिड जॉनसन (David Johnson) यांनी आत्महत्या (Suicide) केली. डेव्हिड जॉनसन 53 वर्षांचे होते. भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने (Anil Kumble) डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. डेव्हिड जॉनसन यांनी आत्महत्येचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण होते डेव्हिड जॉनसन?
डेव्हिड जॉनसन यांचं भारतीय क्रिकेटमधली कारकिर्द फार मोठी नव्हती. 10 ऑक्टोबर 1996 ला डेव्हिड जॉनसन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 26 डिसेंबर 1996 ला ते भारतासाठी शेवटचा सामना खेळले. यानंतर ते टीम इंडियासाठी कधीच खेळले नाहीत. पण स्थानिक क्रिकेट आणि इतर लीग स्पर्धांमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली. डेव्हिड जॉनसन यांच्या आत्महत्येने भारतीय क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. 


जॉनसन यांची क्रिकेट कारकिर्द?
डेव्हिड जॉनसन यांनी दोन कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं. कसोटी सामन्यात त्यांनी 47.67 च्या अॅव्हरेजने 3 विकेट घेतल्या. याशिवाय डेव्हिड जॉनसन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 8 धावांची नोंद आहे. 


अनिल कुंबळे यांची पोस्ट
भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. क्रिकेट जगतातील माझा सहकारी डेव्हिड जॉनसन यांच्या मृत्यूच्या बातमीने मी दु:खी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. याशिवाय सोशल मीडिया युजर्सनेही डेव्हिड जॉनस यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.