मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान फलंदाज आहेत, ज्यांनी शतकं झळकावली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की, असेही काही फलंदाज आहेत ज्यांना वनडे क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज आतापर्यंत बाद करू शकलेला नाही. मुख्य म्हणजे हे भारतातील तीन भारतीय फलंदाज आहेत.


सौरभ तिवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरभ तिवारीने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी त्याला धोनीचा डुप्लिकेट म्हटलं जायचं. सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत टीम इंडियात स्थान पटकावलं होतं. सौरभ तिवारीने 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो टीम इंडियाकडून केवळ तीन वनडे सामने खेळलाय. ज्यामध्ये तो फक्त दोन डावात फलंदाजी करू शकला. या दोन्ही डावात सौरभ तिवारी नाबाद राहिला. 


फैज फजल


फैज फझलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यामुळेच त्याला टीम इंडियामध्ये संधीही देण्यात आली होती. फैजने टीम इंडियासाठी केवळ एक वनडे सामना खेळला. 2016 मध्ये झालेल्या या एकदिवसीय सामन्यात फैज फजलने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 55 धावा केल्या होत्या. 



भरत रेड्डी


भरत रेड्डी हे नाव आजच्या क्रिकेटप्रेमींना माहिती असणं कठीण आहे. भरत रेड्डी भारताकडून केवळ 3 वनडे सामने खेळला होता. भरत रेड्डी यांनी 1978 ते 1981 या कालावधीत भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये दोनदा फलंदाजी करत ते नाबाद राहिले होते.