Team New Jersey Controversy : नुकतंच टीम इंडियाच्या जर्सीवर ( Team India New Jersey ) वाद झाल्याचं दिसून आलं. टीम इंडियाच्या टेस्ट टीमची जर्सी ही चाहत्यांना काही फारशी आवडली नव्हती. याचं कारण होतं ते म्हणजे, जर्सीच्या पुढील बाजूला भारताचं नाव नव्हतं. दरम्यान आता टीम इंडियाच्या जर्सीवरून पुन्हा एकदा नवा वाद ( New Jersey Controversy ) निर्माण होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या या नव्या जर्सीच्या खांद्यावर असलेल्या तीन पट्ट्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या नियमांनुसार ( ICC Rules ) पट्टीची रुंदी जास्त आहे. या पट्टीची रुंदी जास्तीत जास्त 0.5 सेमी असू शकते. परंतु टीम इंडियाच्या ( Team India ) जर्सीवर ती यापेक्षा जास्त रुंद ठेवण्यात आलीये. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला. दरम्यान या सामन्यापूर्वीच, BCCI ने Adidas सोबत करार केला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ची अंतिम जर्सी बनवली. मात्र आता BCCI ने Dream11 सोबत टायअप केलंय. त्यानंतर जर्सी वरून Byjus चं नाव काढून टाकण्यात आलंय. यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाला नवी जर्सी मिळाली. 


टीम इंडियाला तिन्ही फॉर्मेटसाठी नवी जर्सी


वेस्ट इंडिज दौऱ्याविरुद्धच्या टेस्ट, वनडे आणि T20 सिरीजसाठी नवीन जर्सी तयार करण्यात आली. मात्र टीम इंडियाच्या नव्या टेस्ट जर्सीवरून वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे टीम इंडियाच्या नवीन टेस्ट जर्सीमध्ये खांद्यावर असलेल्या तीन पट्टे आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करतात. आयसीसीच्या नियमांपेक्षा पट्टीची रुंदी जास्त आहे. नियमानुसार, पट्टीची रुंदी जास्तीत जास्त 0.5 सेमी असू शकते. दरम्याननियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आयसीसी आता काय एक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय 


डोमिनिका टेस्टमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या त्यांच्याच घरात धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने विंडिजला एक इनिंग आणि 141 रन्सने मात दिलीये. या विजयासह भारताने टेस्ट सिरीजमध्ये भारताने 1-0 अशी  आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स गमावत 421 रन्सवर डाव घोषित केला होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 तर दुसऱ्या डावात 130 पर्यंत मजल मारली. अखेर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल यांचं शतक आणि आर. अश्विनच्या गोलंदाजीच्या जीवावर टीम इंडियाने हा सामना जिंकला.