मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर चौफेर टीका होत आहे. याप्रकरणी आयसीसीनं स्टीव्ह स्मिथचं एका टेस्टसाठी निलंबन केलं आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातल्याच्या बातम्या इंग्लंडमधल्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.


ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये फूट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सगळे वाद सुरु असतानाच आता ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये फूट पडल्याची माहिती समोर येत आहे. हा सगळा वाद सुरु असताना डेव्हिड वॉर्नर त्याच्या मित्रांबरोबर हॉटेलच्या रूममध्ये पार्टी करत होता. या पार्टीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमचा कोणताही सदस्य नव्हता. पार्टीला उपस्थित असलेले सगळे वॉर्नरचे मित्र होते.


वॉर्नरवर भडकले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू


एवढे वाद सुरु असताना वॉर्नरनं केलेल्या पार्टीवर इतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चांगलेच भडकले होते. वॉर्नरला हॉटेलच्या बाहेर काढण्याची मागणीही खेळाडूंनी केल्याची बातमी फॉक्स स्पोर्ट्स या वेबसाईटनं दिली आहे. या बातमीनुसार वॉर्नर ऑस्ट्रेलिया टीमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून लेफ्ट झाला आहे.