Stuart Broad : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉड ( Stuart Broad ) शनिवारी रात्री त्याच्या टेस्ट फॉर्मेटच्या निवृत्तीती घोषणा केली. सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड ( England vs Australia ) यांच्यामध्ये पाचवी आणि निर्णायक टेस्ट मॅच खेळवली जातेय. या सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीला उतरला होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या टीमने त्याला 'गार्ड ऑफ हॉनर' देण्यात आला. यावेळी ब्रॉडच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 जुलै रोजी स्टुअर्ड ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया  ( England vs Australia ) यांच्यातील सध्या सुरू असलेली पाचवी टेस्ट त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मॅच आहे. त्याचवेळी स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad ) रविवारी मैदानावर फलंदाजीसाठी उतरताना भावूक झालेला दिसून आला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 


Stuart Broad चे डोळे पाणावले


अॅशेस सिरीजचा अंतिम आणि पाचवा सामना केनिंग्टन ओव्हलवर खेळला जातोय. या सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. यावेळी इंग्लंडचा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad ) साठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्रॉडने ( Stuart Broad ) सर्वांना याबाबत माहिती दिली. त्याने घेतलेल्या या अचानक निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे. 


तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचे 9 विकेट्स गेले होते. यावेळी चौथ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड उतरला. यावेळी ब्रॉडसोबत जेम्स अँडरसन देखील फलंदाजीला आला होता. ब्रॉड मैदानावर येत असताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दोन्ही बाजूला उभे राहिले. अशात मधून ब्रॉड ( Stuart Broad ) चालत मैदानावर येत असताना गार्ड ऑफ हॉनर देण्यात आला. अशातच ब्रॉडचे डोळे पाणावलेले दिसून आले. 


सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad ) फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्यासोबत जेम्स अँडरसन देखील उतरला. या दोघांच्या जोडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम आपल्या नावे केलेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या जोडीचा एक विश्वविक्रम म्हणजे सर्वाधिक विकेट घेण्याचा. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी आतापर्यंत एकत्र 1037 विकेट घेतल्यात.