मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार फलंदाजी करत दाणादाण उडवून दिली. क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हलमध्ये शतक झळकावून कांगारूंना पळता भुई थोडी केली. या खेळीमुळे भारतीय संघाने एकमेव डे-नाईट कसोटीत आपली पकड मजबूत केलीये. दरम्यान मंधानाच्या फलंदाजी व्यतिरिक्त, तिच्या एका सहकारी खेळाडूने तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू हरलीन देओलने स्मृती मंधानाची स्तुती केली आहे. मंधानाच्या शतकाचा फोटो शेअर करताना हर्लीनने ट्विटरवर लिहिलंय, 'अलेक्सा, कृपया हे गाणे वाजवा - ओ हसीना झुल्फो वाली.'


हर्लीनच्या कमेंटला स्मृतीचं उत्तर


हरलीन देओलने स्मृती मंधानानेही उत्तर दिलं आहे, 'अलेक्सा, कृपया हरलीनला म्यूट करा.' याचसोबत एक मजेदार इमोजी देखील दिला आहे. हर्लीन सध्याचा कसोटी सामना खेळत नाही, परंतु ती मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तिचा भारतीय टीममध्ये तिचा समावेश असतो.



मंधानाची टेस्ट सेंच्युरी


ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी शतक झळकावणारी स्मृती मंधाना पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. तिने आपलं पहिलं कसोटी शतक 171 चेंडूत पूर्ण केलं. मंधानाने 216 चेंडूत 127 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 22 चौकार आणि 1 षटकार ठोकला.