मुंबई : द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलीये. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. तर कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेंडुलकरने ट्वीट करुन या बद्दलचे आपले मत मांडलेय. क्रिकेट हा जेंटलमेन गेम ओळखला जातो. हा असा खेळ आहे जो शुद्ध पद्धतीने खेळला गेला पाहिजे. जे झाले ते वाईट झाले. खेळाची अखंडता टिकून ठेवण्यासाठी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. जिंकणे महत्त्वाचे आहेच पण ते त्याहीपेक्षा कसे जिंकतो हेही महत्त्वाचे आहे. 



याआधी आयसीसीने स्मिथवर एका सामन्यांची बंदी घातली होती. तसेच त्याला त्याला संपूर्ण फी दंड ठोठावण्यात आलाय. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. 


विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरही एकदा बॉल टेंपरिंग वादात अडकला होता. तसेच त्याला शिक्षाही झाली होती. नोव्हेंबर २००१मध्ये द. आफ्रिका दौऱ्यावर पोर्ट एलिझाबेथ कसोटीदरम्यान सचिनवर बॉल टेंपरिंगचा आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर एका कसोटीची बंदी घालण्यात आली होती. 


स्मिथची कबुली


ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.


अशी झाली बॉलशी छेडछाड


दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.