सानिया मिर्जाचे प्रेग्नेंसी फोटोशूट
टेनिस स्टार सानिया मिर्जा सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.
मुंबई : टेनिस स्टार सानिया मिर्जा सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सानिया लवकरच आई होणार असून तिची उत्सुकता तिच्या या फोटोजमधून स्पष्ट दिसत आहे. सानिया मिर्जाने बेबी बंप फोटोशूट केले असून त्याचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात गर्भारपणातील तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
फोटोत सानियाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. बेबी बंपवर हात ठेवलेली सानिया अतिशय सुंदर दिसत आहे.
सानियाचा फॅशन सेन्स वाखाण्यासारखाच आहे. तिच्या या जबरदस्त फॅशन सेन्समुळे ती कायम प्रकाशझोतात राहते. आता गर्भारपणातही तिने हा फॅशन सेन्स सुंदररित्या जपला आहे.
एप्रिलमध्ये एक फोटो शेअर करत सानियाने ही गुडन्यूज आपल्या चाहत्यांना दिली होती. सानिया-शोएबच्या आयुष्यात लवकरच येणार नवा पाहुणा...
भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी १२ एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. तरी देखील सानिया भारतासाठीच खेळते. काही दिवसांपासून ती टेनिस कोर्टापासून दूर आहे. १५ नोव्हेंबर १९८६ साली सानियाचा जन्म मुंबईत झाला. जीवनाचे चढउतार पार करत तिने टेनिस विश्वात जबरदस्त यश मिळवले. तिला पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने तिच्यावर अनेक प्रकारे टिका झाल्या. मात्र त्या सगळ्याला खंबीरपणे सामोरी जात ती आयुष्यातील नव्या टप्प्यावर आहे.