मॉस्को : क्रिकेटमध्ये मॅच फक्सिंगच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असाल, ज्यामुळे अनेक खेळाडूंना अटकही झाली आहे किंवा काही खेळाडूंना मॅच खेळायला बॅन लावला जातो. परंतु तुम्ही दुसऱ्या कोणत्याही खेळातील मॅच फिक्स झाल्याची बातमी फारच कमी ऐकली असावी. त्यात एका महिला खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावल्याचे, तर तुम्ही कधी ऐकलेही नसाल. परंतु आज आम्ही ज्या खेळाडूबद्दल सांगत आहोत. त्या महिला टेनिस खेळाडूला मॅच फिक्सिंगमुळे अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळाडूचे नाव याना सिजिकोवा (Yana Sizikova) आहे. ती रुस ची खेळाडू आहे. तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, इतकी सुंदर महिला एक आरोपी आहे म्हणून. खरेतर तिच्यावरती ग्रँड स्लॅम इवेंटमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.


याना सिजिकोवा, फ्रेंच ओपन 2021 च्या डबल्स इवेंटमध्ये खेळत होती. तेव्हा 3 जूनला पहिला राऊंड खेळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. या खेळात याना आणि तिच्या पार्टनरचा 6-1 ने पराभव झाला.



त्यानंतर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार यानाला चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. तिच्यावरती कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही. तिच्यावरती फक्त संशय व्यक्त करण्यात आला आहे.


जगातील 765 व्या क्रमांकावर असलेली रशियाचा टेनिस स्टार यानाला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रेंच पोलिसांच्या चौकशीला बोलावले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी फ्रेंच ओपन सामन्यात काहीतरी गडबड केल्या संबंधीत तिला बोलावले गेले होते. मात्र, तो कोणता सामना होता, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.