टेस्ट क्रिकेटमध्ये `टॉस`ची प्रथा संपणार?, यावर सौरव गांगुली म्हणतोय...
आयसीसी टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस पाडण्याची प्रथा बंद करणार आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने सोमवारी म्हटलंय की, टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस पाडणे बंद करणे, याला आपलं सहमत नाही. आयसीसी टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस पाडण्याची प्रथा बंद करणार आहे. पहिल्यांदा बॅटिंग की बॉलिंग याचा निर्णय, यजमान टीम म्हणजेच ज्या देशात मॅचेस पार पडतील त्या देशावर असणार आहे. या विरोधात टीम इंडियाचे २ माजी कप्तान बिशन सिंह बेदी आणि दिलीप वेंगसरकरने आवाज उठवला आहे. आता गांगुलीने देखील यात आपली सहमती दाखवत, आयसीसीने टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस न पाडण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे.
सौरव गांगुलीने मत व्यक्त करताना सांगितलं...
गांगुलीने यावर बोलताना सांगितलं, हे पाहणं आधी महत्वाचं आहे, या प्रयोग लागू होतो आहे किंवा नाही, व्यक्तिगत मते टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस न पाडता सामना घेणे, याला माझी सहमती नाही, जर टॉस पाडणे बंद केलं, तर १४० वर्ष जुनी परंपरा बंद होणार आहे.
क्रिकेट जगतात दोन वेगळी मतं
हा विचार आयसीसीच्या नव्या समितीने ठेवला होता, यात आंतरराष्ट्रीय खेळाडू, कोच आणि एलिट पॅनलचे अंपायर यांचा समावेश आहे. या प्रस्ताव आल्यानंतर क्रिकेट जगत दोन भागात वाटलं गेलं, एक म्हणजे टॉस पाडण्याच्या बाजूने, तर दुसरे टॉस नसावा या बाजुने आहेत.
मुंबईत अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली चर्चा
टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत, मुंबईत होणाऱ्या बैठकीत याच विषयावर चर्चा होणार आहे, ही बैठक याच महिन्यात आहे.ऑस्ट्रेलियाचे २ माजी कॅप्टन स्टीव वॉ आणि रिकी पॉटिंगने मात्र या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. तर वेस्टइंडिजचा वेगवान बॉलर मायकल होल्डिंग आणि पाकिस्तानचे माजी कॅप्टन जावेद यांच्यामते यामुळे स्पर्धा वाढणार आहे.