मुंबई : आयपीएलचे सामने संपल्यानंतर टीम इंडियाचे पुढचे दौरेही ठरले आहेत. पण टीम इंडियामध्ये एक असा दिग्गज खेळाडू आहे ज्याला सतत डावललं जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम जाहीर झाली असून त्याला संधी देण्यात आली नाही. याशिवाय त्याला इंग्लंड विरुद्ध सामन्यासाठीही वगळण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणे प्रमाणेच आता आणखी एका दिग्गज खेळाडूचं करिअर धोक्यात असल्याचं दिसत आहे. या खेळाडूचं करिअर संपल्यात जमा असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्याला सतत टीम इंडियातून डावललं जात आहे. निवड समितीने दुसऱ्यांदा पत्ता कट केला आहे. 


श्रीलंका विरुद्ध कसोटी सीरिजमधून या खेळाडूला टीम इंडियातून बाहेर बसवलं. आता या खेळाडूला पुन्हा टीम इंडियात संधी मिळणं कठीण झालं आहे. टीम इंडियातून ईशांत शर्माचा पत्ता कट झाला आहे. 


ईशांत शर्मा 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर ईशांतला पुन्हा टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर सारखे खेळाडू आहेत. त्यामुळे स्पर्धा खूप मोठी आहे. 


या खेळाडूंमुळे ईशांत शर्माचा पत्ता कट झाला आहे. ईशांत शर्माने 105 कसोटी सामन्यात 311 विकेट्स घेतल्या आहेत. तो गेल्या काही काळापासून वाईट फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 


टीम इंडिया 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), कोना भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.