मुंबई : T20 वर्ल्डकप 2021नंतर, रवी शास्त्री यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. ज्या दिवसापासून शास्त्री यांनी आपलं पद सोडले, तेव्हापासून ते सिलेक्टर्स, टीम ड्रेसिंग रूम आणि बोर्डाबाबत मोठमोठी विधानं करताना दिसतायत. तर आता 2019च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवावर शास्त्रींनीही धक्कादायक खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं की, भारताच्या 2019 एकदिवसीय वर्ल्डकप संघात 3 विकेटकीपर निवडणं हे समजण्याच्या पलीकडे होतं. कारण या स्पर्धेसाठी संघात अंबाती रायडू किंवा श्रेयस अय्यर यांची निवड केली जाऊ शकत होती.


2019 च्या वर्ल्डकपच्या काही महिने आधी, तत्कालीन वनडे कर्णधार विराट कोहलीने सांगितलं होतं की, रायुडू या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर खेळेल. मात्र, नंतर एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने रायडूची निवड केली नाही.


टीम सिलेक्शनवर प्रश्न केले उपस्थित


तीन विकेटकीपरऐवजी रायुडू किंवा श्रेयस अय्यरला घेतले पाहिजे, असा खुलासा शास्त्री यांनी केला आहे. शास्त्री म्हणाले, 'त्या संघाच्या निवडीत माझा हात नव्हता. पण, वर्ल्डकपसाठी तीन विकेटकीपरची निवड करण्याचा निर्णयही समजण्यापलीकडे होता. या स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचा तीन विकेटकीपरचा म्हणून संघात समावेश करण्यात आला होता.


ते पुढे म्हणाला, "मी कधीही सिलेक्टर्सच्या कामात ढवळाढवळ केली नाही. मला कोणताही अभिप्राय विचारला गेला तेव्हा मी माझं मत मांडलं. तेव्हाच मी माझ्या मनातलं बोललो. 2019 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने चांगली कामगिरी केली. पण, मँचेस्टरमध्ये उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने भारताचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं."