दुबई : आयपीएलचा थरार फॅन्सना पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. दरम्यान गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान गुरुवारी झालेल्या सामन्यात एका शॉटवर रोहित शर्मा थोडक्यात बचावला आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी करत असता एक घटना घडली, ज्यामुळे प्रेक्षक आणि कॉमेंट्रेटर घाबरले.


डिकॉकचा उत्तम शॉट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं घडलं की, मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 9व्या ओव्हरला क्विंटन डी कॉक स्ट्राइकवर होता. कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज आंद्रे रसेल गोलंदाजी करत होता. या ओव्हरचा दुसरा चेंडू क्विंटन डी कॉकने पूर्ण ताकदीने मिड-ऑफच्या दिशेने खेळला. 


चेंडू इतका वेगाने गेला की तो रोहित शर्मावर आदळणार होता. मात्र तितक्यात रोहित खाली वाकला आणि जमिनीवर पडून आपला जीव वाचवावा लागला.


जर हा चेंडू रोहित शर्माने चेंडू मारला असता तर मोठा अपघात होऊ शकला असता, पण सुदैवाने तसं झालं नाही. डी कॉकचा हा बुलेट शॉट टाळण्यासाठी रोहितला अर्ध्या सेकंदापेक्षा कमी वेळ मिळाला आणि रोहित वेळेवर डक करण्यास यशस्वी झाला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



कोलकात्याचा विजय


कोलकात्याने 7 विकेट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवलाय. मुंबईने कोलकात्यासमोर विजयासाठी 156 रन्संचं आव्हान दिलं होतं. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय अधिक सोपा झाला. या पराभवानंतर मुंबई संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली असून प्लेऑफमध्ये स्थान मिळणं कठीण झालं आहे.