ENG vs AUS,  Ashes 2023: एक असा काळ होता, जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कोणत्याही फलंदाजासाठी बचाव हे सर्वात मोठं हत्यार असायचं, एक काय दोन दोन दिवस प्लेयर आऊट व्हायचे नाहीत. पण आता हा ट्रेंड बदलत चाललाय. कसोटी सामन्यात देखील प्लेयर्स आक्रमक फलंदाजी करताना दिसतात. इंग्लंडच्या कोचपदी ब्रँडन मॅक्युलम (Brandon McCullum) याची निवड झाल्यानंतर बेझबॉल (BazBall) क्रिकेटची क्रेझ वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डावातही रूटची (Joe Root) आक्रमक मानसिकता दिसून आली. चौथ्या दिवशीच्या पहिल्याच सिझनमध्ये जो रूटने बॉलर्सची धुलाई केली. त्यावेळी त्याने रिव्हर्स स्कूप शॉटने (Reverse Scoop Shot) बॉलर्सची दैणा उडवली. 1 सिक्स आणि 2 फोर खेचत त्याने बोलंडच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा कुटल्या. त्यावेळी त्याने एकाच ओव्हरमध्ये 3 रिव्हर्स स्कूप शॉट खेळले. त्यावर आता इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Peterson) याने मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला केविन पीटरसन?


रूटसाठी आकाश ही मर्यादा आहे आणि त्याची काम करण्याची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी असल्याचं केपीने म्हटलंय. रूट रोज सकाळी उठून नवनवीन इच्छा प्रकट करतो. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला एक असा मास्टर दिसत आहे जो दीर्घकाळ असा खेळू शकतो, असं म्हणत केविन पीटरसनने जो रूटचं कौतूक केलंय. त्यावेळी त्याच्या शॉट्समागे आयपीएल (IPL) कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.


आणखी वाचा -  वर्ल्ड कपमधील IND vs PAK सामन्यावर मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य, पाकिस्तानमध्ये उडाली खळबळ!


आयपीएलमधील तो दोन महिने राजस्थान रॉयल्ससह (Rajasthan Royals) होता. त्याच्या खेळात त्याने शॉट्स समाविष्ट केले आहेत. रूटने आयपीएल 2023 मध्ये फक्त 3 सामने खेळले होते जिथं त्याला फक्त एकच वेळा फलंदाजीची संधी मिळाली. गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात रूटला त्याच्या मूळ किमतीत राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं होतं. मात्र, त्याला नंतर संघात संधी मिळाली नाही आणि तो इंग्लंडला मायदेशी परतला होता. त्याला दुखापत झाल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर आता तो अॅशेस सिरीजमध्ये (The Ashes 2023) आग ओकताना दिसतोय.