मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडतायत. भारतीय कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वाद आता सर्वांसमोर आहे. बीसीसीआयने विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं तेव्हापासून विराट आणि बीसीसीआय एकमेकांवर आरोप करताना दिसतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटला कर्णधारपदावरुन हॅटवल्यानंतर बीसीसीआयने संगितलं, सिलेक्टर्स आणि सौरव गांगुली यांनी विराटला टी-20चं कर्णधार सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला रोखलं होतं. मात्र विराटच्या म्हणण्याप्रमाणे त्याला टी-20 कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखलं नाही. दरम्यान आता बीसीसीआयने पुन्हा एकदा विराट कोहलीला प्रत्युत्तर दिलं आहे.


टीम इंडियाचे मुख्य सिलेक्टर्स चेतन शर्मा म्हणाले, "निवड समितीकडे हा मुद्दा आल्यानंतर त्यांनी कर्णधार बदलण्याबाबत चर्चा झाली. यावेळी बैठकीत 90 मिनिटं आधी विराटला फोन केला. ही कसोटीसाठी निवड बैठक होती आणि त्या वेळी आम्ही त्याला याबाबत माहिती देणार नव्हतो. काही प्रश्न होते आणि मात्र चर्चा झाल्यानंतर त्यानेही होकार दिला."


दरम्यान बीसीसीआयमधील प्रत्येकाने कोहलीला टी-20 कर्णधार म्हणून कायम राहण्यास सांगितलं असल्याचा खुलासा शर्मा यांनी केला. कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील कोहलीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं असल्याचं चेतन शर्मा म्हणाले.


आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही परंतु आमच्यात चांगली चर्चा झाली. विराट हा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी खेळावं अशी आमची इच्छा आहे. पण जेव्हा कर्णधारपदाच्या निवडीचा विचार केला तेव्हा सिलेक्टर्सने ठरवलं की दोन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असावा, असंही शर्मा यांनी सांगितलं.


चेतन शर्मा म्हणाले, "कोहली साडेपाच वाजता मीटिंगला आला आणि आम्ही त्याला निर्णयाबाबत कळवलं. सिलेक्टर्ससाठी हा कठोर निर्णय आहे. असे निर्णय आम्हाला घ्यावे लागतात."