दुबई : दिल्ली संघाने पंजाबविरूद्ध अष्टपैलू मार्कस स्टोईनिसच्या तुफानी खेळीमुळे १५७ धावा केल्या. दिल्लीने शेवटच्या तीन षटकांत 57 धावा मिळविल्या. ज्यामध्ये स्टोईनिसचे मोठे योगदान होते. त्याने 21 चेंडूत 53 धावा केल्या, त्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टोईनिसने जॉर्डनला लक्ष्य करत १८ व्या षटकात षटकार आणि चौकार ठोकल्यानंतर शेवटच्या षटकात पुन्हा दोन सिक्स आणि तीन फोर मारल्या. केवळ २० चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकात जॉर्डनने 30 धावा केल्या. दिल्लीची धावसंख्या तीन विकेटसाठी 13 अशी होती.


पावरप्लेमध्ये दिल्लीने तीन विकेट गमवत २३ रन केले. पंत आणि अय्यरने १० ओव्हरमध्ये ४९ रन केले. बिश्नोईने पंतला गुगली टाकत बोल्ड केलं. त्यानंतर शमी शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला आणि अय्यरला त्याने आऊट केलं. दिल्लीचा स्कोर १७ ओव्हरमध्ये ३ अंकी झाला. पण त्यानंतर स्टोइनिसने संपूर्ण खेळ बदलला.


कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ बॉलमध्ये ३९ रन केले. ज्यामध्ये ३ सिक्सचा समावेश आहे. ऋषभ पंतने २९ बॉलमध्ये ३१ रन केले. ज्यामध्ये ४ फोरचा समावेश आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७३ रन केले. शमीने १५ रन देत ४ विकेट घेतले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लेग स्पिनर रवी बिश्नोईने देखील चांगली कामगिरी केली. त्याने २२ रन देत एक विकेट घेतली.