माउंट मोनगानुई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या विजयी दौऱ्यापासून ते आता सुरु असलेल्या न्यूझीलंड दौऱ्याच्या पाच एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत विक्रमाची मालिका कायम ठेवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात सलामीवीर रोहित-धवन जोडीने, शिखर धवन आणि गोलंदाज मोहम्मद शमीने काही विक्रम केले आहेत. 


सलामीवीर रोहित-धवनचा विक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाला गेल्या अनेक मालिकांपासून चांगल्या सुरुवाती देण्यास सातत्याने अपयश येत होते. भारतीय संघाने अनेक फलंदाजांना सलामीसाठी संधी देण्यात आली. पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. पण शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामान्यात दीडशतकी भागीदारी केली. या भागीदारी सोबत या जोडीने सचिन-सेहवाग यांचा विक्रम मोडला. रोहित आणि धवन मध्ये आता पर्यंत पहिल्या विकेटसाठी १४ वेळा १०० पेक्षा धावांची भागीदारी झाली आहे. शिखर धवनने पहिल्या सामन्यात नाबाद ७५ तर दुसऱ्या सामन्यात ६६ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात ८७ धावा केल्या.


पाच हजारी धवन


सलामीवीर शिखर धवनने न्यूझीलंड दौऱ्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ५ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने हा विक्रम ११८ सामन्यांमध्ये पूर्ण केला. सर्वात जलद गतीने ५ हजार धावा पूर्ण करणाऱ्या जागतिक फलंदाजांच्या  यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्वात वेगाने ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा  शिखर धवन हा दुसऱ्या क्रमांकाच फलंदाज झाला आहे. शिखर धवनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद ७५ तर दुसऱ्या सामन्यात ६६ धावांची खेळी केली.


शमीने रचले विकेटचे 'शतक'


भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्धच्या नेपिअरयेथे झालेल्या पहिल्या सामन्यात १०० विकेटचा टप्पा पार केला. त्याने मार्टिने गुप्टीलला बाद करत आपली १०० विकेट मिळवली. शमीने अवघ्या ५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. यासोबतच शमीने भारताकडून सर्वात वेगात १०० विकेट घेण्याचा मान मिळवला.