IPL 2023 Final On Reserve day: आयपीएल इतिहासात (IPL History) पहिल्यांदाच असं घडतंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) आज खेळवला जाणारा सामना पावसाने (Heavy Rain) धुवून काढला. चेन्नई सुपर किंग्ज आणि डिफेन्डिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यातील आयपीएल 2023 चा फायनल सामना आता पुढे ढकल्यात आला आहे. त्यामुळे आता चाहत्यांची देखील निराशा झाल्याचं पहायला मिळतंय. सततच्या पावसामुळे सामना होणार की नाही? अशी चिंता सर्वांना लागून होती, त्यावर आता मोठी अपटेड समोर (IPL 2023 Final Update) आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा फायनल सामना आता रिझर्व्ह डे म्हणजेच राखीव दिवशी (IPL 2023 Final On Reserve day) होणार आहे. उद्या 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात हा सामना होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.



दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात कधीच फायनलचा सामना रिझर्व्ह दिवशी झाला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच अशी घटना घडणार आहे.


चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग XI 


ऋतुराज गायकवाड,डेवोन कॉन्वे, शिवम दुबे/मतीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश तीक्ष्णा.


गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग XI 


शुभमन गिल/जोशुआ लिटिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेविड मिलर, राशिद खान, राहुल तेवतिया, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी.