लंडन : पुढच्यावर्षी होणारा सातवा टी-२० विश्वचषक रद्द होण्याच्या तयारीत आहे. २०१८ मध्ये सर्व संघ द्विपक्षीय सीरीज खेळण्यात व्यस्त असणार आहेत त्यामुळे त्यांना थोडासा वेळ हवा आहे. आयसीसीच्या सुत्रांनी सांगितले की, २०२० मध्ये होणार टी-२० विश्वचषक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२० मध्ये होणारा टी-२० विश्वचषक दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होऊ शकतो. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका (२००७), इंग्लंड ( २००९), वेस्ट इंडिज (२०१०), श्रीलंका (२०१२), बांगलादेश (२०१४) आणि भारतात (2016) मध्ये विश्व टी-२० स्पर्धेचे आयोजन केले आहे.


द्विपक्षीय सीरीजमुळे दोन्ही देशांना चांगले उत्पन्न मिळते त्याचा मोठा हिस्सा प्रसारण करारातून येतो. खासकरून जेव्हा भारत परदेशी दौरा करतो तेव्हा यजमान बोर्ड टीव्ही प्रसारणामधून लाखो डॉलर कमवतो.


भातीय संघ पुढच्यावर्षी अधिक वेळ परदेशी दौऱ्यावर जाणार आहे ज्याची सुरूवात दक्षिण अफ्रीकासोबत होणार आहे त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.


होऊ शकते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 
२०२१ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा कार्यक्रम भारतात होणार आहे. उद्या येथे सुरू होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत टेस्ट चॅम्पियनशिपची चर्चा केली जाऊ शकते.