मुंबई : टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी -20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. विजयानंतर कॅप्टन विराट कोहली बोलला की, 'एकवेळी असे देखील वाटले की मला गोलंदाजी करावी लागेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर विराटने म्हटलं की, 'हा एक रोमांचक सामना होता आणि शेवटी आम्ही जिंकल्यानंतर खूप आनंद झाला. आम्हाला अपेक्षित होते की विरोधी संघ आम्हाला एक कठीण आव्हान देईल. आम्ही किवी संघाला मोठं टार्गेट देऊ शकतो की नाही याबाबत आम्हाला चिंता होती. अशा सामन्यांमध्ये, आपल्या सर्व काही झोकून देण्याची गरज असते आणि खेळाडूंनी तेच करुन दाखवलं.


यानंतर विराट बोलला की, "जेव्हा शेवटच्या क्षणी हार्दिक पांड्याला दुखापत झाली तेव्हा मला वाटले की, इतर 4 चेंडू मला टाकावे लागतील की काय?" सामन्याच्या शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या हाताला दुखापत झाली होती.


ग्रँडहोमच्या जोरदार शॉट आडवण्यासाठी पांड्याने आपला डावा हात मध्ये टाकला ज्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. पांड्या वेदनेने ग्राउंडवर झोपला. फिजियो डग मैदानावर धावत आला. पण पेन-किलर स्प्रे नंतर पांड्या पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि भारताने पूर्ण षटके टाकून विजय मिळविला. पण जर पांड्याला पुढचे 4 बॉल टाकता आले नसते तर विराटला ते 4 बॉल टाकावे लागले असते. कदाचित यामुळे भारत हारला देखील असता.