Shubman Gill ला रिप्लेस करणार `हे` 3 खेळाडू? 24 शतकं ठोकणाऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता
Shubman Gill: वर्ल्डकप सुरु असून अशा परिस्थितीत वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत टीमला जोखीम पत्करायची नाही. हीच बाब लक्षात घेऊन बीसीसीआयने शुभमन गिलच्या बदलीचा शोध सुरू केला पाहिजे.
तन्मय टिल्लू, झी मीडिया, मुंबई: टीम इंडियाच्या ( Team India ) अडचणी काही संपायचं नाव घेत नाही. शुभमन गिल ( Shubman Gill ) आजारी असल्याने अजून काही वर्ल्डकपचे सामने खेळू शकणार नाहीये. दरम्यान अशा परिस्थितीत लवकरच इंडियन टीमच्या मॅनेजमेंटला शुभमनच्या ( Shubman Gill ) जागी रिल्पेसमेंट शोधावी लागणार आहे. डेंग्यूची लागण झाल्याने शुभमन ( Shubman Gill ) खेळण्यासाठी पूर्णपणे फीट नाहीये. अशा परिस्थितीत 3 खेळाडूंची नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जातंय.
वर्ल्डकप सुरु असून अशा परिस्थितीत वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत टीमला जोखीम पत्करायची नाही. हीच बाब लक्षात घेऊन बीसीसीआयने शुभमन गिलच्या बदलीचा शोध सुरू केला पाहिजे. पाहूयात असे कोणते खेळाडू आहेत, जे शुभमन गिलला रिप्लेस करू शकतात.
यशस्वी जयस्वाल
वर्ल्डकप 2023 मध्ये ओपनर शुभमन गिलची जागा घेऊ शकणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ). यशस्वीने नुकतंच आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केलंय. चीनमध्ये खेळल्या गेलेल्या एशियन गेम्समध्ये त्याने शानदार शतक झळकावलं होतं. त्याची आयपीएलची कामगिरीची चांगली होती. एकंदरीत त्याचा खेळ पाहता शुभमन गिलच्या जागी त्याला संधी देण्यात येऊ शकते.
ऋतुराज गायकवाड
2023 च्या वर्ल्डकपमध्ये ओपनर शुभमन गिलची जागा घेण्यासाठी मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडचं नाव देखील चर्चेत आहे. ऋतुराजने एशियन गेम्सनमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. सोबतच त्याने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2023 मध्येही त्याचा खेळ चांगला होता. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाडला वर्ल्डकपच्या टीममध्ये स्थान देण्यात येऊ शकतं.
24 शतकं ठोकणारा हा फलंदाज ठरणार परफेक्ट रिप्लेस्मेंट
गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला खेळाडू म्हणजे शिखर धवन. धवनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 24 शतकं आहेत. यासोबतच वनडे क्रिकेटमधला त्याचा विक्रमही उत्कृष्ट आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम ओपनरच्या फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. शिखरने आतापर्यंत टीम इंडियासाठी एकूण 167 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 164 डावांमध्ये 6793 रन्स केलेत. त्यामुळे शिखर धवन शुभमनची चांगली रिप्लेसमेंट ठरू शकतो.