मुंबई : सामना जिंकल्यानंतर पार्ट्यांमध्ये ड्रिंक्स घेत सेलिब्रेशन करणं ही टीम इंडियाची जुनी पद्धत आहे. टीम इंडियातील बरेच खेळाडू दारूचं सेवन करतात. मात्र, टीम इंडियामध्ये असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी आजपर्यंत दारूला स्पर्शही केलेला नाही. पाहूयात भारतातील हे खेळाडू जे दारूचं सेवन करत नाहीत. 


1. भुवनेश्वर कुमार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या टीमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. दारूचं सेवन न करणाऱ्यांमध्ये भुवनेश्वर कुमारचं नाव घेतलं जातं. तो दारू आणि सिगारेटला हातंही लावत नाही. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. 


2. राहुल द्रविड


टीम इंडियामधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज म्हणजे राहुल द्रविड. काही काळ राहुल द्रविडकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुराही देण्यात आली होती. भारताचा 'द वॉल'ची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तो बिलकुल दारूचं सेवन करत नाहीत. starsunfolded.com च्या एका रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने कधीही स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग केलेलं नाही.


3. गौतम गंभीर


टीम इंडियाच्या 2011 सालच्या वर्ल्डकप विजेता गौतम गंभीर व्यसनांपासून दूर राहतो. starsunfolded.com ने दिलेल्या रिपोर्टप्रमाणे, गौतम गंभीर धूम्रपान करत नाही आणि तो दारूलाही हात लावत नाही. गंभीरने दारूची जाहिरात केली आहे मात्र या व्यसनापासून कोसो दूर आहे.


4. परवेज रसूल


जम्मू-काश्मीरसाठी स्थानिक सामन्यांचा कर्णधार असलेला परवेझ रसूल व्यसनाच्या सवयीपासूनही दूर आहे. परवेझ रसूलने भारतीय संघासाठी एक वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे.