मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँकरॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिथ आणि वॉर्नरचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं वर्षभरासाठी तर बँकरॉफ्टचं नऊ महिन्यांसाठी निलंबन केलं आहे. स्मिथच्या निलंबनानंत ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कोण होणार याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. या स्पर्धेत पाच खेळाडूंचा समावेश आहे.


टीम पेन


दक्षिण आफ्रिकेच्या उरलेल्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं टीम पेनला कर्णधार केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीमध्ये पेन सगळ्यात पुढे आहे. पण पेन टीममधून सारखा आत-बाहेर असतो. पेनच्या कारकिर्दीतही अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. पेननं फक्त 12 टेस्ट आणि 30 वनडे खेळल्या आहेत. टेस्टमध्ये पेनची सरासरी 41.66 आहे तर वनडेमध्ये पेन 70.52 च्या स्ट्राईक रेटनं रन्स बनवतो.


मिचेल मार्श


मिचेल मार्शनं नुकतचं टीमसाठी चांगलं प्रदर्शन केलं आहे. अॅशेसमध्ये मिचेल मार्शच्या बॅटिंगचं कौतुक झालं. मार्शनं 27 टेस्टमध्ये दोन शतकं आणि 1166 रन्स केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्यानं 93.08च्या स्ट्राईक रेटनं 1428 रन्स केल्या आहेत.


उस्मान ख्वाजा


उस्मान ख्वाजा अनेक दिवसांपासून टीममध्ये आहे. ख्वाजानं 32 टेस्टमध्ये 6 शतकं आणि 2166 रन्स केल्या आहेत. 18 वनडेमध्ये ख्वाजानं 82.28 च्या सरासरीनं 469 रन्स केल्या आहेत.


पॅट कमीन्स


24 वर्षांचा पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात यशस्वी फास्ट बॉलर आहे. कमिन्सनं 13 टेस्टमध्ये 57 विकेट तर 39 वनडेमध्ये 64 विकेट घेतल्या आहेत. कमिन्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये एकवेळा 5 विकेट आणि पाचवेळा 4 विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये त्यानं चारवेळा 4 विकेट घेतल्या आहेत.


मायकल क्लार्क


36 वर्षांच्या मायकल क्लार्कनं पुनरागमन करुन पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. क्लार्कनं 2015 साली अॅशेस सीरिजनंतर निवृत्ती घेतली होती. 115 टेस्टमध्ये क्लार्कनं 28 शतकं आणि 8,643 रन्स केल्या आहेत. क्लार्कनं 245 वनडेमध्ये 7,981 रन्स केल्या आहेत.