मुंबई : आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय टीम असलेली चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखीस तितकाच लोकप्रिय आहे. पण लवकरच तो क्रिकेटमधून सन्यास घेऊ शकतो. पण त्याच्या नंतर चेन्नईचा कर्णधार कोण असणार याची चर्चा रंगू लागली आहे. धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीच्या रुपात भारतीय टीमकडे नवा चेहरा उपलब्ध होता. पण आयपीएलमध्ये धोनीची जागा कोण घेणार याची उत्सूकता अनेकांना आहे. चेन्नईमध्ये असे 3 खेळाडू आहेत धोनीची जागा घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सुरेश रैना : या टीममधलं पहिलं नाव आहे सुरेश रैना. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये याआधी गुजरात लायंसच्या कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वी रित्या निभावली आहे. त्यामुळे धोनीनंतर रैनाचं नाव अधिक चर्चेत आहे.


2. ड्वेन ब्रावो : चेन्नईचा ऑलराउंडर ड्वेन ब्रावो मागील अनेक सीजनपासून चेन्नईकडून खेळतो आहे. त्यामुळे त्याची कामगिरी पाहता त्याच्याकडे देखील कर्णधारपदाची धुरा दिली जावू शकते.


3. रविंद्र जडेजा : रविंद्र जडेजा हा देखील चेन्नई संघातला मोठा खेळाडू आहे. धोनीसोबत राहून त्याने क्रिकेटमधल्या अनेक गोष्टी शिकल्या आहेत. त्यामुळे तो देखील धोनीची जागा घेण्याची क्षमता ठेवतो.