India vs Pakistan, Jasprit Bumrah Returns : येत्या रविवारी श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये हा सामना रंगणार असून सर्व चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे. अशातच आता पाकिस्तानविरूद्धच्या ( India vs Pakistan ) सामन्यापूर्वी अजून एक मोठी बातमी समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतातून एक घातक खेळाडू रवाना झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तो फलंदाजांची दाणादाण उडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


सुपर 4 मध्ये भिडणार भारत-पाकिस्तान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात रंगणाऱ्या सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दोन्ही टीममध्ये ग्रुप स्टेजमध्ये खेळलेला सामना पावसामुळे पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हायव्होल्टेज सामना रद्द झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला खरा. मात्र आता पुन्हा एकदा 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार श्रीलंकेत दुपारी ३ वाजता सामना सुरु होणार आहे.


फ्लाईट पकडून श्रीलंकेला पोहोचला खेळाडू


भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) फ्लाईट पकडून थेट श्रीलंकेत पोहोचलाय. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 फेरीच्या सामन्यात तो उपलब्ध असणार आहे. नुकतंच बुमराची पत्नी संजना गणेशन हिने चिमुकल्या मुलाला जन्म दिला आहे. बुमराह आणि संजनाने मुलाचे नाव अंगद ठेवलंय.


दरम्यान बाळाच्या जन्मासाठी बुमराहने ( Jasprit Bumrah ) एशिया कपची टूर्नामेंट मध्येच सोडून मायदेशी परतला होता. तो नेपाळविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्यानंतर आता तो बाळाच्या जन्मानंतर टीममध्ये सामील झाला असून पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यातही तो गोलंदाजी करणार आहे.


भारत-पाक सामन्यात होणार पावसाचा खेळ?


10 सप्टेंबर रोजी रंगणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात पाऊस पडणार असल्याची माहिती आहे. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, या दिवशी संपूर्ण दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचसोबत रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल. सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शक्यता वर्तवण्यात येतेय. 


जर रविवारी पाऊस पडला तर काय होणार असाही प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. दरम्यान इनसाइडस्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, जर 10 सप्टेंबर रोजीच्या भारत पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्यात पाऊस आला तर या सामन्यासाठी रिझर्व डे ( Reserve Day ) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर पावसामुळे 10 सप्टेंबर रोजीचा सामना रद्द झाला तर तो 11 तारखेला खेळवण्यात येणार आहे.