मुंबई : भारतात सर्वाधिक क्रिकेट चाहते आहेत. येथे खेळाडूंना महान व्यक्तीचा दर्जा देण्यात ही चाहते चुकत नाहीत. आपल्या कामगिरीने आतापर्यंत अनेक खेळाडूंना लोकांची मने जिंकली आहेत. म्हणूनच लोकांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे. अशा महान खेळाडूंच्या जर्सी देखील नेहमीच चर्चेत राहिल्या. केवळ क्रिकेट जगतातच नाही तर वेगवेगळ्या खेळांमध्ये देखील अशी अनेक उदाहरणे आहेत जेथे या महान खेळाडूंनी घातलेली जर्सी खेळाडूसोबत कायमची निवृत्त झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल ह्युजेस


ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्युजेस मैदानावर वापरत असलेली जर्सी एका दुखापतीनंतर निवृत्त झाली. 2014 मध्ये घरच्या सामन्यादरम्यान ह्यूजच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले पण त्याचा जीव वाचू शकला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या सन्मानार्थ ह्युजेसची जर्सी क्रमांक 64 कायमची निवृत्त केली. आता ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर या क्रमांकाच्या जर्सीत कधीच दिसणार नाहीत.


पारस खडका


नेपाळ क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार पारस याने ऑगस्ट 2021 मध्ये निवृत्तीची घोषणा केली. त्याने संघासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन क्रिकेट बोर्डाने विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेतला. पारस नेपाळकडून 77 क्रमांकाच्या जर्सीमध्ये खेळला आणि त्याची ही जर्सी देखील कायमची निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नेपाळ संघाचा कोणताही खेळाडू ही जर्सी घालून मैदानात उतरणार नाही.


सचिन तेंडुलकर


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटवर राज्य केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या या महान व्यक्तीच्या सन्मानार्थ BCCI ने त्याची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.


2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आणि काही वर्षांनी शार्दुल ठाकूर या जर्सीमध्ये भारताकडून खेळायला आला. सचिनच्या जर्सी नंबरमध्ये खेळल्यानंतर लोकांनी बीसीसीआयला टार्गेट केले. तसेच शार्दुलवरही जोरदार टीका करण्यात आली. यानंतर बोर्डाने ही जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.