T20 World Cup 2024: येत्या 2 जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाला 1 जून रोजी बांगलादेश विरूद्ध वॉर्म-अप सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ कांऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिययमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. 


528 दिवसांनंतर टीम इंडियासाठी खेळणार हा खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्ध होणारा सराव सामना स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतसाठी खूप खास असणार आहे. तो बऱ्याच दिवसांनी टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. ऋषभ पंतने 2022 च्या अखेरीनंतर टीम इंडियासाठी एकही सामना खेळला नाही. त्यामुळे तो आता या सराव सामन्याच्या निमित्ताने तब्बल 528 दिवसांनी टीम इंडियासाठी खेळणार आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी पंतच्या कारचा अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर पंत बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर होता. 


IPL मध्ये ऋषभ पंतची कमबॅक


ऋषभ पंतने आयपीएल 2024 च्या मध्येच मैदानात कमबॅक केलं होतं. याआधी त्याने 2022 च्या अखेरीस त्याने प्रोफेशनल सामना खेळला होता. ऋषभ पंतने केवळ कमबॅकच केलं नाही तर धडाकेदार खेळी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. पंतने आयपीएल 2024 च्या 13 सामन्यांमध्ये 40.55 च्या सरासरीने 446 रन्स केले आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 155.40 होता. यामध्ये पंतच्या नावे ३ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील उत्तम खेळीनंतर बीसीसीआयकडून त्याची टी-20 वर्ल्डकपला सिलेक्शन झालं.


प्लेईंग 11 मध्ये कोणत्या विकेटकीपरला मिळणार संधी?


ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांचीही T-20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियामध्ये विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आता प्लेइंग 11 साठी पहिली पसंती कोण असेल हे ठरवणं खूप कठीण जाणार आहे. पंतच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला अनेक वेळा खेळण्याची संधी मिळाली. दोघांचाही खेळ आयपीएलमध्ये चांगला सुरु होता. त्यामुळे आता दोघांपैकी कोणत्या खेळाडूला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार हे पहावं लागणार आहे. 


वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडियाचा स्क्वॉड?


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज