This Player Likely To Return In Team India: भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ 29 जून रोजी भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला त्याच दिवशी संपुष्टात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबरच द्रविडचा करार टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या शेवटपर्यंतच होता. यानंतर 9 जुलै रोजी बीसीसीआयचे सचीव जय शाह यांनी पुढील पाच वर्षांसाठी कोलकाता नाईट रायडर्सला 2024 चं आयपीएलचं जेतेपद जिंकवून देणारा गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केलं. गंभीरच्या निवडीवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच त्याच्या हाती संघाचं प्रशिक्षकपद गेल्याने अनेक महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. त्यातही काही खेळाडूंसाठी गौतमच्या नियुक्तीबरोबरच 'अच्छे दिन' येणार असं मानलं जात आहे. त्यापैकी सध्या सर्वात आघाडीला असलेला खेळाडू मैदानावर जोरदार सराव करत घाम गाळत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या खेळाडूने थेट बीसीसीआयशी पंगा घेतल्याने तो संघाबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या याच खेळाडूच्या सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


कोण आहे हा खेळाडू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीर श्रीलंकेच्या दौऱ्यापासून भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेणार आहे. असं असतानाच या दौऱ्यामध्ये गंभीरच्या वशिल्यावरुन यंदाच्या पर्वात केकेआरला जेतेपद पटकावून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरची संघातील एन्ट्री निश्चित मानली जात आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला बासीसीआयने खेळाडूंबरोबर केलेल्या केंद्रीय करार झालेल्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस नाव नाहीये. म्हणजेच सध्या श्रेयस हा बोर्डाबरोबर करारबद्ध खेळाडू नाहीये. मात्र असं असतानाही गंभीरची नियुक्ती झाल्यानंतर श्रेयसचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याने संघात परतण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. श्रेयसला भारतीय संघात संधी मिळणार या वृत्ताला कोणीही कोणाताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र श्रेयसची तयारी पाहता तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


गंभीरने निवड समितीकडे टाकला शब्द


'टेलीग्राफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, अय्यरला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये भारतीय संघात स्थान मिळू शकते. गौतम गंभीरने निवड समितीच्या सदस्यांबरोबर नुकत्याच केलेल्या बैठकीमध्ये काही खेळाडूंसंदर्भात आग्रही भूमिका समितीकडे मांडल्याचं समजतं. गंभीरने काही खेळाडूंना भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्याची आपली इच्छा समितीला बोलून दाखवली आहे. यामध्ये श्रेयस अय्यरचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे केकेआरशी संबंधित इतरही काही खेळाडूंना लॉटरी लागू शकते असाही एक अंदाज आहे. 


नक्की वाचा >> BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण


व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?


आता श्रेयसच्या व्हायरल व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तो स्टेडियममध्ये धावताना दिसत आहे. पावसामध्ये श्रेयस सराव करत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच लक्ष वेधून घेताना दिसतोय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



ओढावून घेता बीसीसीआयचा रोष


मागील काही महिन्यांपासून बीसीसीआय श्रेयस अय्यरवर नाराज दिसत आहे. श्रेयस घरगुती क्रिकेट स्पर्धा खेळाला नाही म्हणून बीसीसीआयच्या निवड समितीने श्रेयसविरुद्ध शिस्तभंगासंदर्भातील कारवाई केली. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी त्याची निवड केली. पण पुन्हा प्रकृतीसंदर्भातील कारणाने त्याला वगळण्यात आल्यानंतर नियमांनुसार त्याच्या कारवाई करत त्याला बीसीसीआयकडून केंद्रीय करारातूनच वगळण्यात आलं.


नक्की पाहा >> 'सुंदर अशा...', शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; 'ती' पोस्ट Viral


आता श्रेयस खरं कधी आणि कशी टीममध्ये एन्ट्री घेतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.