मुंबई : टीम इंडियात फ्लॉप खेळाडू म्हणून ज्यांना हिणवलं आणि टीममध्ये घेण्यासाठी दुर्लक्ष केलं त्यांनीच आयपीएलच्या पंधराव्या हंगामात जादू करून दाखवली. आयपीएलमध्ये या खेळाडूंचा खऱ्या अर्थानं जलवा पाहायला मिळाला. ते खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक, उमेश यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल सारख्या खेळाडूंचा यामाध्ये समावेश आहे. पुष्पा सिनेमाचा तुम्ही डायलॉग ऐकला असेल की फ्लावर नहीं फायर है तसंच अगदी या खेळाडूंनी आपल्या फिरकीची जादू आयपीएलमध्ये दाखवली. 


या खेळाडूंसोबत उमरान मलिक, आयुष बदोनी सारखे खेळाडूही पुढे येत असल्याने टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे. उमेश यादवने आयपीएलच्या 7 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. 23 धावा देऊन 4 विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने केला. 


दिनेश कार्तिकची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. बंगळुरूचा सर्वात मोठा मॅचविनर ठरला आहे. 7 सामन्यात त्याने 210 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकसाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडतील अशी आशा आहे. 


टी 20 वर्ल्ड कपमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहललाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. कुलदीप यादवने 6 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलने 6 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. 


शिवम दुबे सतत फ्लॉप ठरला होता. त्याने 6 सामन्यात 226 धावा केल्या आहेत. तर 2 अर्धशतक झळकवले आहेत. बुमराहला मात्र म्हणावं तेवढं यावेळी यश आलं नाही. टी 20 वर्ल्ड कपसाठी यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.