Asia Cup 2023 Final Race: सध्या टीम इंडिया ( Team India ) एशिया कप ( Asia Cup 2023 ) खेळण्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. यावेळी टीम इंडिया एशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे. 


11 व्यांदा टीम इंडिया खेळणार एशिया कपची फायनल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेला नमवत भारताने एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) फायनलमध्ये धडक मारलीये. टीम इंडियाला 11व्यांदा एशिया कपच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता एशिया कप-2023 च्या विजेतेपदासाठी भारताचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो. हा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. जर टीम इंडिया ( Team India ) एशिया कप जिंकली तर ती आठव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.


ही टीम फायनलच्या रेसमधून बाहेर


बांग्लादेशाची टीम एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलीये. सुपर 4 मध्ये बांगलादेशाला एकंही विजय मिळवता आलेला नाही. आतापर्यंत त्यांनी 2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. शकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रथम पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेशी झाला. आता 15 सप्टेंबरला भारताचा बांगलादेशशी सामना होणार आहे. 


पाकिस्तानवरंही बाहेर होण्याची टांगती तलवार


सर्वांची इच्छा आहे की, एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये पुन्हा एकदा भारत-विरूद्ध पाकिस्तान आमने-सामने यावेत. मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा टीमचा प्रवासही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 सामना होणार आहे. हा सामना जिंकणारी टीम 17 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध आशिया कप 2023 चा अंतिम सामना खेळेल. भारताने गेल्या सामन्यात दोन्ही टीमचा पराभव केलाय. 


पाकिस्तान-श्रीलंका सामन्यात पाऊस पडला तर...


अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र जर या सामन्यात पाऊस आला तर आणि सामना रद्द झाला तर दोन्ही टीमकडे 1-1 पॉईंट जाणार आहे. म्हणजेच श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमचे 3-3 पॉईंट्स होतील. अशावेळी नेट रनरेटच्या जोरावर दोघांपैकी एक टीम फायलन गाठू शकते. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानपेक्षा श्रीलंकेच्या टीमचं नेट रनरेट चांगलं आहे.