Pakistan cricket: नुकंतच भारतात वनडे वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या टीमने या स्पर्धेत बाजी मारत वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या टीमची कामगिरी फार काही चांगली होताना दिसली नाही. वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानच्या टीमला केवळ 4 विजय मिळवणं शक्य झालं आहे. यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये बरेच मोठे बदल पहायला मिळाले. टीमचा कर्णधार बाबर आझमने तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोडून दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपनंतर पाकिस्तानची टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यावर पाकिस्तानच्या टीमला 3 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. या सिरीजपूर्वी प्रॅक्टिस सामने सुरु असून या सामन्यात एक अशी घटना घडलीये, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. 


प्रॅक्टिस सामन्यांमध्ये पाकिस्तानची टीम Prime Minister's XI टीमविरूद्ध आमने-सामने आली होती. दरम्यान या सामन्याच्या पहिल्यांदाच एक मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय. ब्रॉडकास्टर्सच्या चुकीमुळे पाकिस्तानी टीमचं नाव लाईव्ह स्कोरमध्ये 'पाकी' असं लिहिण्यात आलं होतं. मुळात हा शब्द वंशवादी असल्याने यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.  


ब्रॉडकास्टर फॉक्स क्रिकेटने लाइव्ह स्कोअरवर पाकिस्तान टीमसाठी हा शब्द लिहिला होता. एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने त्याच्या एक्स अकाउंटवर ही पोस्ट केलीये. नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्याकडून झालेल्या या चुकीबद्दल माफी मागितली आणि त्यानंतर ती सुधारली. 'पाकी' ही अपमानास्पद वांशिक शब्द आहे. जन्म किंवा वंशानुसार पाकिस्तानी किंवा दक्षिण आशियाई व्यक्तीचा संदर्भ देण्यासाठी याचा वापर केला जातो.



पाकिस्तान क्रिकेटकडून यावर स्पष्टीकरण आलं असून त्यांच्या म्हणण्यानुसार, हे ग्राफिक डेटा प्रोवाडरचं अॅटोमॅटेज फीड होतं. हे यापूर्वी पाकिस्तान टीमसाठी कधीही वापरण्यात आलं नव्हतं. हे नक्कीच खेदजनक असून त्रुटी लक्षात येताच आम्ही चूक लक्षात येताच त्यामध्ये सुधारणा केली आहे. 


पाकिस्तानी कर्णधाराचं द्विशतक


Prime Minister's XI विरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानी टीमने पहिला डावात 9 विकेट्स गमावून 391 रन्स केले आणि डाव घोषित केला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने पहिल्या डावात नाबाद 201 रन्स ठोकले. यानंतर प्राईम मिनिस्टर इलेव्हनने दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा दोन गडी गमावून १४९ रन्स केले होते.


14 डिसेंबरपासून टेस्ट सामन्याला होणार सुरुवात


ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 14 डिसेंबरपासून टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पहिला टेस्ट सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी डावखुरा फलंदाज सॅम अयुब आणि वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद यांना पहिल्यांदाच पाकिस्तानी टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.