IND Vs ENG Test: टीम इंडिया सध्या इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळतेय. 3 सामने खेळले गेले असून टीम इंडियाने यापैकी 2 सामने जिंकले आहेत आणि सिरीजमध्ये आघाडी घेतलीये. यावेळी सिरीजमधील तिसरा सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर दहशतवादी संकट घोंगावत असल्याचं समोर आलं आहे. २३ फेब्रुवारी रोजी होणारा भारत-इंग्लंड क्रिकेट सामना रद्द करण्याची धमकी शिख फॉर जस्टिस संघटनेने दिलीये. यासोबतच इंग्लंड क्रिकेट टीमलाही माघारी जाण्याची धमकी देण्यात आली आहे.


पोलिसांकडून तपासणी सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी रांची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हिडिओची पडताळणी केली जातेय. यासंदर्भात रांचीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, शिख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट टेस्ट सामना रद्द करण्याचं आवाहन सीपीआय करण्यात आलंय. झारखंड आणि पंजाबमध्ये खळबळ उडवून दिलीये. 


सिख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू हा पंजाबचे रहिवासी आहे. मात्र तो सध्या अमेरिकेत राहतो. व्हिडिओमध्ये त्याने इंग्लंड टीमला माघारी जाण्याची धमकीही दिलीये. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हे दहशतवादी कृत्य असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.


व्हिडीओमध्ये काय म्हणाला पन्नू?


या व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंग पन्नू सीपीआय माओवाद्यांना चिथावणी देत ​​असून आदिवासींच्या जमिनीवर क्रिकेट खेळू देऊ नये, असे सांगतोय. अशा वादग्रस्त व्हिडिओंमुळे सरकारचे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न केला जातोय.


चौथ्या कसोटीसाठी कशी असेल टीम इंडिया - रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.