सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करो या मरोची स्थिती


भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधला हा दुसरा टेस्ट सामना आहे. केपटाउनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये भारताचा 72 रनने पराभव झाला होता. सीरीजमध्ये 0-1 ने दक्षिण आफ्रिका पुढे आहे. आज भारतीय टीमसाठी करो या मरोची स्थिती आहे.


संघात 3 बदल


टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये 3 बदल केले आहेत. शिखर धवनच्या जागी आज केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. ऋद्धिमान साहाच्या जागी पार्थिव पटेलचं कमबॅक झालं आहे तर भुवनेश्वर कुमारच्या जागी ईशांत शर्माला संघात घेण्यात आलं आहे. ईशांतचा निर्णय अनेकांना थोडा आश्चर्यचकीत करणारा वाटला. अजिंक्य रहाणेला दुसऱ्या टेस्टमध्ये देखील जागा नाही मिळाली.